

जळगाव : साईबाबा मंदिर, मेहरुण येथे मंदिराच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनानिमित्त दि. २३, २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी दरबार मेरे साई का हा भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत भक्तिमय वातावरणात साईभक्तांसाठी विशेष सेवा होणार आहे. तसेच दि. २५ जानेवारी रोजी महाप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम दुपारी ११ ते ३ या वेळेत पार पडणार आहे.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध साई कथाकार श्री. साई गोपाल जी देशमुख (बीड) हे साईचरित्र व कथांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या साई कथांमुळे भाविकांना साईबाबांच्या जीवनतत्त्वांचा अनुभव घेता येणार आहे.
या धार्मिक व सामाजिक उपक्रमासाठी श्री. प्रशांत सुरेश नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिरात देणगी करण्यासाठी ९९२३८९९३३८ या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.




