जळगावशैक्षणिक

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्री मंडळ निवडणूक व शपथविधी सोहळा संपन्न

जळगाव (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी शालेयस्तरीय मंत्री मंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना विकसित व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व प्रा. योगेश धनगर व प्रा. प्रमोद भोई यांनी केले. निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निवडणुकीनंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवारांची नावे प्रभारी प्रा. अर्जुन शास्त्री यांनी जाहीर केली.

प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी सोहळा पार पडला. निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी शपथ दिली. या प्रसंगी पर्यवेक्षक सौ. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

निवडण्यात आलेले मंत्री मंडळ पुढीलप्रमाणे आहे —

मुख्यमंत्री :- पूर्वा हेमराज भारंबे

उपमुख्यमंत्री :- अखिलेश रामकृष्ण मोतीराळे

सांस्कृतिक मंत्री :- अंकित मिलिंद पाटील

क्रीडा मंत्री :- हरीष कमलाकर शिंपी

स्वच्छता मंत्री :- तनुश्री प्रकाश सूर्यवंशी

शिस्तपालन मंत्री :- छायेश संदीप भोळे

ग्रंथालय मंत्री:- नंदिनी सुधाकर मेटे

पर्यावरण मंत्री :- स्पंदन देविदास शिंपी

आरोग्य मंत्री:- रोहिणी संजीव झोपे

अन्न व पाणीपुरवठा मंत्री:- तुषार निलेश पाटील

सामाजिक कार्य मंत्री:- सुमित अनिल कावडकर

वित्त मंत्री:- गौरव दुर्गादास कांबळे

शिक्षण मंत्री:- तृषांत सुभाष महाजन

संरक्षण मंत्री:- अक्षरा प्रविण महाजन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत बोइनवाड यांनी मानले.

या शालेय मंत्री मंडळाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मार्गदर्शक समितीत प्रा. शोभना कावळे, प्रा. महेंद्र राठोड, प्रा. दिनेश महाजन, प्रा. पूजा सायखेडे व प्रा. सूर्यकांत बोइनवाड यांचा समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मंडळ वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि क्रीडाविषयक उपक्रम राबविणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमेश ठाकरे,प्रा.प्रमोद भोई, प्रा.हेमंत पिंपळे, प्रा.गुणवंत वंजारी,प्रा.घनश्याम सोनवणे, प्रा.दिनेश महाजन,प्रा. राजेंद्र निकुंभ, शिक्षकेतर कर्मचारी श्री.विजय जावळे यांनी विशेष प्रयत्न केले.

उप प्राचार्य प्रा. आर.बी ठाकरे यांनी नवनिर्वाचित मंत्री मंडळाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “नेतृत्व हे जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थी मंत्री मंडळाने शिस्त, कर्तव्यभावना आणि सेवाभाव जपत महाविद्यालयाचा लौकिक वृद्धिंगत करावा.” कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण सभागृहात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button