

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांच्या पुण्यस्मरणार्थ १६ जुलै २०२५ रोजी शाळेमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते एक वही एक पेन अभियानांतर्गत मुलांना वही वाटप करण्यात आले.

यावेळी स्वर्गवासी सुरेशमामा नाईक यांच्या पुण्य तिथीनिमित्त शाळेच्या परिसरात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.




