

जळगाव – आज 20 एप्रिल 2025 रोजी श्री संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनच्या गाडगेबाबा उद्यान, जळगाव येथे विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष श्री अशोक मन्साराम बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या हितासाठी काही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यात जळगाव शहरातील अपंग बांधवांना विनाशर्थ घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच घरकुलांचे वीज बिल संपूर्णपणे माफ करण्यात यावे, यासह ईतर महत्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांसाठी दिनांक 25 एप्रिल 2025, शुक्रवार रोजी सकाळी 9 ते 10 दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून जळगाव शहर महानगर पालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वरत्न अपंग संस्थेचे अध्यक्ष अशोक मन्साराम बाविस्कर यांनी केले आहे.
सदर बैठकीला संस्थेच्या मुक्ताईनगरच्या पदाधिकारी दिपाली गजानन पाटील, पिंप्राळा येथील समाजसेविका वैशाली ठाकूर, तसेच संस्थेचे कार्यकर्ते योगेश गवळी, नंदा जोशी, तीलोत्तमा उत्तम पाटील, सागर बाविस्कर, विलास चौधरी व विलास मोरणकर यांच्यासहत शहरातील व जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी या आंदोलनात सर्वांनी सामील होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.



