जळगावसामाजिक

‘अशोक खरात’ प्रकरणात रुपाली चाकणकरांवरही कारवाईची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक येथील कथित ‘भोंदू बाबा’ कॅप्टन खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या श्रीलंपट खरात याने अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार, फसवणूक व ब्लॅकमेलिंग केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.

तसेच, संबंधित कार्यक्रमांमध्ये रुपाली चाकणकर सहभागी झाल्याचे फोटो व व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. शिवाय, त्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमध्येही संबंधित व्यक्ती सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

एक वर्षापूर्वी अहिल्यानगर येथील एका पत्रकाराने या ‘भोंदू बाबा’ विरोधात तक्रार केल्यानंतर ती दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्या पत्रकारावर दबाव आणून माफीनामा लिहून घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, कॅप्टन खरात याच्यावर ज्या-ज्या गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी  माजी नगरसेवक अशोक  लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button