जळगावसामाजिक

असोदा येथे भव्य विश्वकर्मा मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

(असोदा ता. जळगाव) – येथील भोळेनगर परिसरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, दिनांक ३० रोजी सकाळी १० वाजता भव्य विश्वकर्मा भगवान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा विक्रम पाटील (विक्की भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य तुषार भाऊ महाजन, जिल्हा परिषद सदस्य रवि भाऊ देशमुख, उमेश बाविस्कर, माजी सरपंच विलास दादा चौधरी, बाळकृष्ण पाटील, दुर्गादास भोळे, उपसरपंच गिरीष भोळे, वि. का. सोसायटीचे चेअरमन सुभाष महाजन (बापू), सर्वोदय एज्युकेशन संस्थेचे भोजू महाजन, ग्रामपंचायत सदस्य सुनील बाळासाहेब पाटील, जीवन कोळी, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजोग कोळी (पिंटू), लखन जोहरे, शशिकाका पाटील, माजी सरपंच चंदन बिर्‍हाडे, ललित कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय मंडळ, असोदा (रजि. नं. ९७९६) अंतर्गत कार्यकारी मंडळ सदस्य राजेंद्र शिंदे, अंकुश पाटील, भगवान चौधरी, अरुण शिंदे, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, नितेश कापडी, वसंत खैरनार, पदमाकर साळुंखे, सचिन साळुंखे, राहुल वडसत्ते, योगेश साठमोहन, भगीरथ साठमोहन आदींनीही भूमिपूजन सोहळ्यात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शुभांगी महाजन यांनी केले. परिसरातील कार्यकर्ते व महिलांनी सोहळ्याच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या भूमिपूजन सोहळ्यामुळे असोदा गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक बहरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button