

जळगाव – सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती व उपहार फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मोफत आरोग्य तपासणी ,औषधोपचार ,मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शहरातील शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र या ठिकाणी करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग बालकांना गोड खाऊ,वृक्ष रोप,प्रथिने (प्रोटीन)डबा आदी देण्यात आले.याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री नवल राजे पाटील, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी,उपहार फाउंडेशनचे अध्यक्ष पवनभाऊ जैन,शुभम क्लिनिकचे डॉ. मेहुल पटेल,वैभव निकुंभ,महेश पाटील,अक्षय महाजन आदी उपस्थित होते.
सध्या साथीचे तसेच पावसाळ्यात होणारे आजार व त्यावर घेण्याची काळजी याबाबत डॉ. मेहुल पटेल यांनी माहिती दिली तर प्रस्ताविक मुकुंद गोसावी यांनी करून आरोग्य शिबिरा बाबत माहिती दिली तसेच सर्वांनी मिळून आरोग्य मंत्री महोदय यांना मोठ्या उत्साहात वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना दिल्या.




