ताज्या बातम्या

राजू मामांना तांबट समाजाचा जाहीर पाठिंबा

जळगाव –  जळगाव शहराला दोन पंचवार्षिक पासून आमदार सुरेश भोळे ( राजू मामा ) यांच्या सारखे चांगले व लोकप्रिय नेतृत्व लाभलेले आहे . त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. नेहमी प्रमाणे या निवडणुकीत देखील तांबट सामाजाचा आपल्याला पाठींबा राहणार असल्याचे पत्र तांबट समाज विकास मंडळातर्फे आमदार सुरेश भोळे यांना देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपण भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी कामे करावी असेही तांबट समाजाच्यावतीने सांगण्यात आले.

वसंत स्मृती या बळीराम पेठेतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तांबट समाजाच्या शिष्टमंडळातर्फे समर्थनाचे पत्र देण्यात आले. या पाठींब्याबद्दल आमदार सुरेश ( राजू मामा ) भोळे यांनी समस्त तांबट समाजाचे आभार मानले व सदैव आपल्या सेवेत राहण्याचे व विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तांबट समाजाचे अध्यक्ष कैलास तांबट, उपाध्यक्ष सदाशिव तांबट, सुधीर तांबट, स्वप्नील तांबट, नितीन जांगडे, पदमाकर तांबट, यांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button