जळगावराजकारण

खा. स्मिता वाघ संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. संसदेमधील त्यांचे सक्रिय योगदान, प्रश्न विचारण्यातील सातत्य आणि समित्यांमधील उल्लेखनीय सहभाग या सर्व निकषांवर आधारित त्यांच्या कार्याची ही पावती आहे. खासदार स्मिता वाघ यांनी १८व्या लोकसभेत आतापर्यंत एकूण २६ चर्चांमध्ये सहभाग घेतला असून, त्यांनी संसदेत तब्बल १३० प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची संसदेत उपस्थिती ९६% इतकी असून, ही सातत्यपूर्ण उपस्थिती त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानली जात आहे. खासदार वाघ यांचा सन्मान जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून २०१० साली ‘संसदरत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांचा गौरव करून त्यांचे योगदान उजळवण्याचे हे एक प्रतिष्ठित व्यासपीठ आहे. यावर्षी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. यंदा महाराष्ट्रातून सात खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यामध्ये स्मिता वाघ यांच्यासह सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button