जळगावराजकारण

न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आजाद समाज पार्टी तर्फे निषेध

जळगाव (दि. ९ ऑक्टोबर २०२५) — सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर अनुचित शब्दप्रयोग व टीका करून करण्यात आलेल्या भ्याड  हल्ल्याचा आजाद समाज पार्टीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य तसेच जळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना जिल्हाध्यक्ष श्रीकांत (सतीश) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनात न्यायमूर्ती गवई यांच्याविरोधात झालेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सन्मानाचे रक्षण व्हावे, अशी मागणी करण्यात आली.

आजाद समाज पार्टीतर्फे या प्रसंगी असे नमूद करण्यात आले की, “न्यायमूर्ती गवई हे देशातील सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश असून त्यांच्यावर केलेली टीका ही न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहे. संविधानाचा अपमान करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी.” निवेदन सादर केल्यानंतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी संविधान, न्याय आणि समतेच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा प्रभारी प्रकाश सोनवणे,  पारोळा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब विसावे, एरंडोल तालुकाध्यक्ष लखन बनसोडे, जळगाव महानगर अध्यक्ष चंद्रभान मोरे, विजय सुरवाडे, वसंत सपकाळे, संदीप वारुळे, सचिन सपकाळे, योगेश तायडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button