जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित सर्व प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रंथपाल श्री. पंकज वाघ यांनी शिवगर्जना करून कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात केली.

प्रथम वर्ष विद्यार्थिनी शिक्षिका साक्षी रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक करताना दीपिका सोनार यांनी महाराजांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे सांगून धैर्य, शिस्त, परिश्रम व देशप्रेम ही मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले.

मनोगत व्यक्त करताना ग्रंथपाल श्री. पंकज वाघ यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे विचार स्पष्ट केले. तसेच प्रथम वर्ष विद्यार्थी-शिक्षक स्मिता कासार, अमित मंडपे व द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षक प्रियंका पाटील यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमात जयश्री पाटील यांनी सुमधुर गीत सादर केले, तर हर्षदा जोशी यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराजांचा दूरदर्शी दृष्टिकोन समजावून सांगितला व त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमुदिनी नरेंद्र तायडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. नारायण खडके यांनी विशेष प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल श्री. पंकज वाघ तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button