जळगावसामाजिक

दान केल्याने घरात लक्ष्मी नांदते – ह.भ.प. विनोद सम्राट नारायण महाराज निंभोरा

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर चौक येथे ह.भ.प. नारायण महाराज निंभोरा यांचे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कीर्तनात महाराजांनी “दान केल्याने घरात लक्ष्मी नांदते” या विषयावर प्रभावी विचार मांडले.

महाराजांनी सांगितले की दान हे केवळ संपत्ती देणे नसून, मनाची शुद्धी आणि समाजसेवेचा मार्ग आहे. दान करणाऱ्या व्यक्तीच्या घरात आनंद, समाधान आणि लक्ष्मीचे वास होते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाच्या शेवटी आरतीने वातावरण भक्तिमय झाले.मेहरुण परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.दैनिक हरिनाम किर्तन सहभाग गायक ह.भ.प. राजु महाराज, बोरगांव, ह.भ.प. लखन महाराज, धोनखेडा

मृदुंगांचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, राजु पेटी वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, अंभई विणेकरी : श्री. भास्कर महाजन, श्री. अशोक देवरे, मेहरूण टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button