जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात रिबिन कटिंग करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, सहा. प्रा. सुवर्णा अहिरे तसेच श्री. पंकज वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिता जावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स. प्रा. सुवर्णा अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील यांनी सादर केले.

प्रास्ताविकामध्ये त्यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यानंतर डॉ. प्रतिभा पाटील यांनी एड्सविषयी सामाजिक जाणीव कशी निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे यांनी एड्सबद्दल समाजातील गैरसमज दूर करण्याची गरज तसेच जागरूकता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या निमित्ताने महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे परीक्षण डॉ. अनिता जावे यांनी केले. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून एड्सविषयी जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

स्पर्धेत

• प्रथम क्रमांक : अश्विनी अशोक बागुल

• द्वितीय क्रमांक : हर्षदा हेमंत जोशी

• तृतीय क्रमांक : रिंकू धारासिंग पावरा

तसेच उत्तेजनार्थ : भाग्यश्री रमेश सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके यांनी दिलेल्या परवानगीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, स. प्रा. सुवर्णा अहिरे, निधी शर्मा, जयश्री शिंगाडे, श्री. पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, श्री. चंद्रकांत सपकाळे तसेच दोन्ही वर्षांचे विद्यार्थी-शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button