श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊ पुरस्कार-२०२५

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. नगरसेवक तथा संस्था अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक ,शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला मालार्पण झाल्यानंतर राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते उपक्रमशील उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात आले. स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत इयत्ता ४ थी चा सुयोग सूर्यकांत जगताप इयत्ता ४थी च्या जिजाऊ मातेच्या वेशभूषेत परी सोनार, सानवी कोठाडे व यामिनी भालेराव त्यांनी वेशभूषा केली होती. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थांनी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता सानप यांनी केले. तर सूत्रसंचालन सुवर्णा अंभोरे यांनी तर करिष्मा घुगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शितल कोळी, उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, शारदा तडवी, दिनेश पाटील व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.






