जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी  

जळगाव – सद्गुरू शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे 2 ऑक्टोबर 2025 महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यां होत्या. . कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच प्रास्ताविक करताना प्रा. निधी शर्मा यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता’ म्हणून गौरविले जाते हे स्पष्ट केले . याच दिवशी, जागतिक स्तरावर ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण गांधीजींनी अहिंसक आंदोलनाद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि जगभरातील अनेक नागरी हक्क चळवळींना प्रेरणा दिली. त्यानंतर डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी महात्मा गांधी बद्दलचे विचार व त्यांची शिक्षण पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर जयश्री पाटील यांनी गांधीजींनी स्वदेशी, खादी आणि आत्मनिर्भरतेला तसेच मस्त व्यवसाय व उद्योग यांना प्रोत्साहन दिले आणि जबाबदार नागरिक बनण्याची आठवण करून दिली. सहाय्यक प्राध्यापक सुवर्णा अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण मातृभाषेतून असावे, मोफत व सक्तीचे असावे आणि शिक्षणात हस्त व्यवसायाला प्राधान्य असावे, असे त्यांचे शैक्षणिक विचार स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ अनिता वानखेडे यांनी शिक्षणाने चारित्र्य निर्मिती, स्वावलंबन, आणि नैतिक मूल्यांची शिकवण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षणाने मुलांना सत्य, अहिंसा, साधेपणा यांसारखी मूल्ये शिकवली पाहिजेत आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक घडले पाहिजे. तसेच गांधीजींचे व्यक्तिमत्व कसे थोर होते हे अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. मूल औद्योगिक शिक्षण व्यवस्था आजच्या काळामध्ये कशी गरजेची आहे व तिचा आजच्या शिक्षण पद्धतीची योग्य रीतीने संबंध जोडला तर विद्यार्थी हे स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षिका दिपाली पाटील यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम घेण्यासाठी प्रा. डॉ.नारायण खडके यांनी परवानगी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button