
जळगाव: नुकतीच जळगाव शहरातील मुस्लिम धर्मगुरु श्री. मुफ्ती हारून नदवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने व्हीआयपी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुफ्ती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साजिद शहा, रिज़वान शेख, शोएब मनियार, राहिल शहा, जुनैद खान आणि पत्रकार फैज़ान शेख व व्हीआयपी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.






