जळगावराजकारण

समाजवादी पार्टीच्या महिला महानगर अध्यक्षपदी फिरोजा शेख, पदाधिकाऱ्यांचीहि नियुक्ती

जळगाव – समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव शहर समाजवादी पार्टी तर्फे पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम ८ ऑगस्ट २०२५ रोजी अजिंठा चौफुली परिसरातील जळगाव समाजवादी पक्षाच्या कार्यालयात उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला यात महिलांचाहि मोठा सहभाग दिसून आला.

जळगाव महानगर महिला आघाडीया अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या फिरोजा शेख यांची नियुक्ती करण्यात आली. हि नियुक्ती जळगाव महानगर अध्यक्ष रिजवान जहांगीरदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली,  तद्नंतर रिजवान जहागीरदार यांनी पुष्पगुच्छ देऊन फिरोजा शेख यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव रईस कुरेशी, महानगर उपाध्यक्ष इमरान साहिल, महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष लुकमान लोखंडवाला, महानगर अल्पसंख्याक उपाध्यक्ष तौसीफ खान, तसेच झफर भाई, अफसर भाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फिरोजा शेख यांनी पदभार घेताच लगेचच त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या महिला कार्यकर्त्यांची देखील नियुक्तीपत्र देऊन पदनियुक्ती केली. यामध्ये जळगाव शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी संगीता मोरे व शबाना शेख, जळगाव शहर महिला आघाडी महानगर सचिव पदी किरण शर्मा नियुक्ती करण्यात आली. तर युवा आघाडी महानगर अध्यक्ष म्हणून अज़ीज मुजावर, युवा आघाडी महानगर उपाध्यक्ष शफीक शेख, शिक्षक आघाडी महानगर अध्यक्ष आवेस पठान, मेडिकल असोसिएशन महानगर अध्यक्ष इमरान खान, वैद्यकीय महानगर अध्यक्ष शोएब मनियार यांची देखील नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button