जळगावशैक्षणिक

स्वच्छतेमुळे आपण अनेक आजारांना हरवू शकतो: डाॅ.उमेश पाटील

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये स्वच्छता पंधरवडा अभियानाचा शुभारंभ

जळगाव –  श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर स्वच्छता पंधरवडा अभियान- 2025 ची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन डाॅ. उमेश पाटील यांच्या हस्ते करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी आजारी पडू नये म्हणून प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना हात कसे धुवावे ?स्वच्छता कसे राखावी? याचे मार्गदर्शन परिसरातील डॉ. उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.प्रसंगी डॉ. पाटील यांनी सांगितले की स्वच्छता ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण स्वच्छतेमुळे आपण अनेक आजारांना हरवू शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. उमेश पाटील यांचे झाडाचे रोप देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका करिष्मा घुगे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button