

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे उपस्थित होत्या. तसेच डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, सहा. प्रा. सुवर्णा अहिरे, श्री. पंकज वाघ तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानाच्या प्रतीला पुष्प अर्पण करण्यात आले. सर्व प्राध्यापक व विद्यार्थी-शिक्षकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानाबद्दल आदर व्यक्त केला.
यानंतर डॉ. जयश्री पाटील यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व यावर थोडक्यात प्रकाश टाकला. विद्यार्थी-शिक्षक हर्षदा जोशी यांनी भावपूर्ण कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच डॉ. अनिता जावे यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्याची सामजिक-लोकशाहीक बाजू याविषयी माहिती दिली.

समारोपाच्या भाषणात प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे यांनी संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मूलभूत अधिकार तसेच कर्तव्ये यांची आठवण करून दिली. “संविधान ही आपल्या राष्ट्राची दिशा आणि नीती आहे. नागरिकांनी कर्तव्य पार पाडणे ही संविधान दिनाची खरी प्रेरणा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षक अक्षय जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके यांनी दिलेल्या परवानगीबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, स. प्रा. सुवर्णा अहिरे, निधी शर्मा, जयश्री शिंगाडे, श्री. पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, श्री. चंद्रकांत सपकाळे आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.




