जळगावक्रिडा

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीराम विद्यालय प्रथम

जळगाव – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या संघाची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्या मुलींच्या व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या मुलांच्या संघाचा तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका सौ. सरस्वती पाटील यांचा श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री. पन्नालाल वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव श्री. अशोक लाडवंजारी आणि संचालक श्री. भगवान लाडवंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव तथा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. अशोक भाऊ लाडवंजारी यांनी पुढील विभागीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील सर यांनी केले. सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button