

जळगांव: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा परिषद व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५- २६च्या शालेय मनपा क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली असून यात सर्वप्रथम शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेने सुरुवात झाली. सदर स्पर्धा दि.१८ व १९ऑगस्ट २०२५ दरम्यान स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे यांनी मैदानाचे पूजन व श्रीफळ फोडून केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर (क्रीडा संचालक मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालय) हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सचिन निकम (क्रीडा अधिकारी जळगाव), कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक डॉ रणजीत पाटील, तर आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र राठोड यांनी केले. सदर स्पर्धा १४ वर्षाआतील, १७ वर्षाआतील, १९ वर्षे आतील अशा ३ विविध गटांमध्ये घेण्यात आल्या.या स्पर्धेत शहरातील एकूण २७ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..
१९ वर्षाआतील (मुले)
विजयी – सेंट लॉरेन्स हायस्कूल.
उपविजयी – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय.
१९ वर्षाआतील (मुली)
विजयी – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय.
उपविजयी – सेंट लॉरेन्स हायस्कूल.
१७ वर्षाआतील (मुले)
विजयी – ए.टी.झांबरे विद्यालय
उपविजयी – ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल.
१७ वर्षाआतील (मुली)
विजयी – ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल.
उपविजयी – बाल विश्व माध्यमिक विद्यालय.
१४ वर्षाआतील मुले
विजयी – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय.
उपविजयी – सेंट लॉरेन्स हायस्कूल
१४ वर्षाआतील (मुली)
विजयी – ओरीयन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल.
उपविजयी – सेंट लॉरेन्स स्कूल.




