जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मानवाधिकार दिवस साजरा

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मानवाधिकार दिवस साजरा

आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजीमानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र . प्रा . डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील , सहा .प्राध्यापक निधी शर्मा , सुवर्णा अहिरे , श्री पंकज वाघ , श्री अरविंद पवार , श्री चंद्रकांत सपकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स . प्राध्यापक सुवर्णा अहिरे यांनी केले त्यामध्ये त्यांनी मानवाधिकार दिवस का साजरा केला जातो त्याच्या मागील पार्श्वभूमी सांगितली .त्यानंतरमहाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे मॅडम यांनीमानवाधिकार दिवस दरवर्षी 10 डिसेंबर 1948 रोजी साजरा केला गेला त्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली मानवाचे मूलभूत अधिकार जसे व्यक्तीचे स्वातंत्र्य ,जीवन आणि सुरक्षा ऐतिहासिक संयुक्त राष्ट्र मानवाधिकार घोषणांमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत.याबद्दल चर्चा केली . मानवी हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि म्हणून त्याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन निधी शर्मा यांनी केले .

कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button