जळगावआरोग्यसामाजिक

चोपडा येथे एसबीआय आणि शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

चोपडा (प्रतिनिधी) – आज 14 जून 2025 रोजी, जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखा आणि शासकीय सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता शासकीय रुग्णालय परिसरात भरवण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष सामाजिक बांधिलकी जपत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. “समाजाचे देणे लागतो” या भावनेतून एकूण 71 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. या उपक्रमात चोपडा शहरातील एसबीआयचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या शिबिरासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक श्री. धर्मेंद्र कुमार, श्री. प्रकाश बिशवाल, श्री. आशिष जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय प्रशासनिक कार्यालय जळगाव येथील अधिकारी आणि चोपडा शाखेतील श्री. गजानन पाटील, श्री. संकेत खोडवे, श्री. विशाल तांगडे, श्री. वाल्मीक बागुल, श्री. रवी हरणे आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराच्या आयोजनात चोपडा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील, श्री. दीपक पगारे व त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयोजित व सेवाभावी पद्धतीने शिबिराचे व्यवस्थापन करून उपक्रम यशस्वी केला.

या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेस चालना मिळाली असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button