जळगावसामाजिक

गुरुपौर्णिमेनिमित्त मेहरुण श्री साईबाबा मंदिरात भक्तिभावाचे वातावरण; २००० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जळगाव – गुरुपौर्णिमेनिमित्त मेहरुण येथील श्री साईबाबा मंदिरात मोठ्या भक्तिभावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच साईभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वेदमंत्रांच्या गजरात पाच महाराजांच्या हस्ते साईबाबांचा अभिषेक संपन्न झाला.

यावर्षी अभिषेकाचा मान श्री योगेश नाईक व सौ. निकिता नाईक (मेहरुण) यांना लाभला. या धार्मिक सोहळ्यासाठी राजाभाऊ जोशी यांनी विशेष सहकार्य केले.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा २००० भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसादासाठी लागणारे धान्य, भाजीपाला, तूप, तेल, तांदूळ, गॅस तसेच इतर सर्व साहित्य अनेक उदार देणगीदारांनी उपलब्ध करून दिले. महाप्रसाद वाढण्यासाठीही परिसरातील असंख्य स्वयंसेवक व साईभक्तांनी उत्स्फूर्तपणे सेवा दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व देणगीदार, स्वयंसेवक, साईभक्त तसेच सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे साईबाबा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत नाईक यांनी मनःपूर्वक आभार मानले.

गुरुपौर्णिमेच्या या पावन सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने भारावून गेला. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देत साईबाबांच्या चरणी हजारो भाविकांनी प्रार्थना अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button