शैक्षणिकजळगाव

नाहाटा महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 रोजी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. स्मिता मोहन फालक व मा. सौ. कल्पना महेश फालक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डी. एन. पाटील, युवती कल्याण समिती चेअरमन प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, महिला तक्रार निवारण समिती चेअरमन , प्रा. डॉ. विद्या पाटील तसेच एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. के. राठोड आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता भिरुड उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य आणि आहार, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा व कायदे, समाज माध्यमे आणि वाढती गुन्हेगारी अशा विविध विषयांवर माहिती प्राप्त झाली. या स्पर्धेसाठी फक्त विद्यार्थिनीच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा हिरीरीने सहभागी झाले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. खुशबू तडवी, द्वितीय क्रमांक कु. राखी अवस्थी यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. स्मिता चौधरी व प्रा. डॉ. स्वाती फालक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विद्या पाटील, आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गौरी पाटील व सूत्रसंचालन प्रा. पूनम महाजन यांनी केले.

स्पर्धेचे नियोजन व आयोजन साठी समिती सदस्य प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. डॉ. निलीमा पाटील, प्रा. स्मिता बेंडाळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. एस. विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button