क्रिडाजळगाव

*राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ व समारोप*

*राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ व समारोप कार्यक्रम संपन्न*

जळगाव दि.11 ( जिमाका ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा सेपक टकारा असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय सेपक टकरा (17 व 19 वर्षे मुले / मुली) क्रीडा स्पर्धा 2024-25 चे आयोजन दि. 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. 14 नोव्हेंबर रोजी या स्पर्धांतील अंतिम सामना व तृतीय क्रमांकाचे सामने पार पडले असून निकाल देखील जाहिर करण्यात आले आहेत.

 

17 वर्षीय वयोगटात पुणे विभागाचे मुल व मुली विजयी झाले. तर द्वितीय क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर मुले आणि मुंबई विभागाच्या मुलींनी बाजी मारली. नागपूरचे मुले आणि कोल्हापूरच्या मुली यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

19 वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांकाचे बक्षिस लातुरचे मुल आणि नाशिकच्या मुलींनी मिळवले. तर द्वितीय क्रमांकावर कोल्हापूरच्या मुली आणि नाशिकच्या मुलांनी बाजी मारली. तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीनगरच्या मुलामुलींनी मिळवला.

 

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त संघांना कवयीत्री बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे क्रीडा संचालक मा. डॉ. दिनेश पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. प्रदिप तळवेलकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती अंजली पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव- श्री. रविंद्र नाईक यांच्या हस्ते मेटल, ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेतुन राष्ट्रीय सेपक टकारा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा 17 व 19 वर्षे मुले व मुली या वयोगटातील संघाचे नाव जाहीर करण्यात आले. अशा प्रकारे जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय जळगाव व जिल्हा सेपक टकारा असोसिएशन, जळगांव यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button