

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये आनंददायी शनिवार उपक्रमा मध्ये जागतिक मैत्री दिनानिमित्त *मैत्रीची बाजारपेठ* हा उपक्रम राबविण्यात आला.मैत्री’ला आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान असून आजच्या डिजिटल युगात मैत्रीच्या बाजारपेठे मध्ये मानवी जीवनासाठी आवश्यक कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅब, पेन ड्राईव्ह, विविध पुस्तके , विविध प्रकारची झाडे, ठेवण्यात आली होती. आजच्या डिजिटल युगात मैत्री विकत घेता येते. आणि एवढेच नव्हे तर “मैत्री विकतच घेतली पाहिजे.”कारण चांगले मित्र एकमेकांना अभ्यासात मदत करतात आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करण्यास प्रोत्साहित करतात. आणि आजच्या डिजिटल युगात या सर्व गोष्टी आपल्याला मोठे होण्यासाठी खूप उपयोगी आहे. असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.मैत्री दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आम्ही आजच्या युगातील डिजिटल वस्तूंशी मैत्री करू पण त्यामधून चांगला बोध घेऊ अशी शपथ घेतली. उपशिक्षिका उज्वला नन्नवरे यांच्या संकल्पनेतून मैत्रीची बाजारपेठ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षाला मैत्रीचा धागा बांधला. सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



