जळगावआरोग्य

उमा महेश्वर मंदिर, उमाळे येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

उमाळे (ता. जळगाव) – दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण सोमवार निमित्त ‘उमा महेश्वर मंदिर’, उमाळे येथे श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास मंदिरात येणाऱ्या भाविकांचा व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर शिबिरात उमाळे, धानवड, चिंचोली, कंडारी, नेरी तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल व डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी सर्वसामान्य आरोग्य तपासणी केली, तर नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधे देण्यात आली, तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी डॉक्टरांनी रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले. शिबिरात कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, प्राची खालसे, भावना यांनी देखील योगदान दिले. तसेच आकाश सोनवणे यांनी रुग्णांची रक्त तपासणी केली. या शिबिराचे आयोजन श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवल परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय उमाळेचे सरपंच रघुनाथ चव्हाण आणि माजी सरपंच मनोहर पाटील यांचे सहकार्य लाभले. येत्या उर्वरित दोन श्रावण सोमवारी देखील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयोजकांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button