

जळगाव – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘आदिवासी संस्कृतीची’ ओळख करून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी यांनी आदिवासींची पारंपारिक वेशभूषा साकारत आपले मनोगत व्यक्त केले. या दिनाचे औचित्य साधत आदिवासी वेशभूषा चे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्य व जागतिक आदिवासी दिनाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच आदिवासी बांधवांचा आत्मसन्मान जागविणाऱ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चौधरी व आभार प्रदर्शन करिश्मा वंजारी यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक निलेश पवार , अश्विनी शिंपी, शिल्पा कोंगे, अनिता सोनवणे, कल्याणी महाजन ,पुष्पा मोरे, भाग्यश्री सुर्वे ,नयना अडकमोल आदी उपस्थित होते.




