

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात ११ ऑगस्ट रोजी रानभाज्या व पाककला प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊप प्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील तसेच प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मनोजकुमार जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. बऱ्हाटे यांनी रानभाज्यांचे पौष्टिक महत्व स्पष्ट करताना पावसाळ्याच्या सुरुवातीला उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन केले.
स्पर्धेत २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. केवळ विद्यार्थिनी नव्हे तर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. कटूरले, अंबाडी, अळू, तांदूळ जीरा, अंबूशी, चीवई अशा रानभाज्यांच्या पाककृती सादर करून उपस्थितांना त्यांचा आस्वाद घेण्याची संधी देण्यात आली.
प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. फ्रकलीन यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्य प्रा. सपना नारखेडे, प्रा. श्रुती रूले, प्रा. ज्योती जंगले, प्रा. शेख, प्रा. वंदना राठोड, प्रा. वर्षा अठे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




