जळगावसामाजिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात चिमणी दिनानिमित्त माझं घर – चिमणीचं घर” हा अभिनव उपक्रम

जळगाव – चिमणी दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये चिमणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये “माझं घर – चिमणीचं घर” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याची भांडी ठेवली, दाणे टाकले तसेच काही विद्यार्थ्यांनी घरटी तयार करून चिमण्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले.

तसेच जनजागृती उपक्रम यांचेही आयोजन करण्यात आले. “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button