जळगावआरोग्य

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत ४०० जणांची आरोग्य तपासणी

जळगाव :  गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल, जळगाव यांच्या मार्फत ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे  21सप्टेंबर 2026 रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ३०० विद्यार्थी व १०० नागरिक अशा एकूण ४०० जणांची आरोग्य तपासणी करून सर्वांना मोफत होमिओपॅथी औषधी चे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. किशोर देशमुख, डॉ. आशा शंकवार, डॉ. काजल आर्या,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे आणि फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. अभिलाषा मुंडदा यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला दिला. या कार्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बिभीषण पोळे, विशंभर ढगे, दीपाली बोर्डे, फिया पटेल,धनश्री तायडे,दीपिका पाटील, धनश्री पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

सदर आरोग्य शिबीर श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग आणि रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या सहकार्याने तसेच पर्यवेक्षक निलेश पवार सर यांच्या नियोजनातून शिबिर यशस्वीपणे पार पडले. विद्यार्थ्यांसोबतच परिसरातील नागरिकांनीही या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button