जळगावक्रिडा

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा सर्वसाधारण विजेता, जळगाव-ठाणे उपविजेते

जळगाव  दि. ४ ऑक्टोबर – एकलव्य क्रीडा संकुल, जलतरण तलाव, जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्टेट व्हेटरन्स ऑक्वाटीक असोसिएशन आणि जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 27 वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धामध्ये नांदेड जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपदाची चमकदार ट्रॉफी पटकावली.

अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत जळगाव आणि ठाणे जिल्ह्याला संयुक्तपणे उपविजेते (Runner-up Troffie) पद ट्रॉफी मिळवली.

बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्यस्टेट व्हेटरन्स ऑक्वाटीक असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण सावंत संस्था अध्यक्ष डॉ. अरविंद शिरभाते सचिव शेखर भावसार जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण असोसिएशनचे सचिव संजय चौधरी, ऑर्गनायझर सेक्रेटरी कमल किशोर मणियार, तसेच श्री दिलीप बापू पाटील अँडव्हॉकेट आर आर पाटील, माजीशिक्षणाधिकारी पी जी बावस्कर, श्री अनिल बाफना,प्रा. डॉ नितीन बारी व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेत एकूण 22 जिल्ह्यातील वय वर्ष 25 ते 85 वर्ष वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.

नांदेडच्या संघाने 33 सुवर्ण, 26 सिल्वर 13 रौप्य पदकां सह सर्वाधिक 269 गुण मिळवित विजेतेपदावर आपले नाव कोरले.तर ठाणे संघाने 33 सुवर्ण,09 सिल्वर 06 रौप्य पदकांसह सर्वाधिक 204 गुण मिळवले तर यजमान जळगाव जिल्ह्याने ही उत्कृष्ट कामगिरी करत जळगावच्या संघाने 11 सुवर्ण, 24 सिल्वर 32 रौप्य पदकांसह सर्वाधिक 189 गुणमिळविले प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा 200 व 100 आणि 50 मीटर फ्री स्टाइल, पुरुष व महिला, 100 व 50 मीटर पुरुष व महिला, बॅक स्ट्रोक पुरुष व महिला, 100 व 50 मीटर बटरफ्लाय, 100 व 50 मीटर बेसस्ट्रोक 100 मीटर व 50 मिडले 50 फ्री स्टाइल रीडले, 200 मीटर आय एम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रौढ जलतरण संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button