जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आशय युक्त अध्यापन पद्धती (C.C.M.Workshop)चे आयोजन

जळगाव – आज दिनांक 01/01/2025 प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आशय युक्त अध्यापन पद्धतीची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रतिभा पाटील, यांनी प्रथम सत्रात आशय युक्त अध्यापन पद्धती ची संकल्पना व्याख्या, वैशिष्ट्ये, अध्यापन पद्धतीचे हेतू , मराठी , हिंदी इंग्रजी विषयाच्या संरचना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रा. निधी शर्मा , यांनी आशय विश्लेषण संकल्पना, आशय विश्लेषण घटक विज्ञान आणि गणित विषयाची संरचना याविषयीं मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक सुवर्णा अहिरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात. डॉ . प्रभारी प्राचार्य अनिता वानखेडे यांनी कार्यशाळाची पार्श्वभूमी, कार्यशाळेचे उद्देश सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.निधी शर्मा यांनी केले .
कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button