जळगावशैक्षणिक

सुजय महाजन प्राथमिक विद्यालय व प्रेमाबाई जैन विद्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव – सुजय महाजन प्राथमिक विद्यालय व कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी जळगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजानन सूर्यवंशी सर तसेच धनश्री पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थी भाषणामध्ये प्रतीक्षा भोलवणकर, माहेश्वरी विसपुते, दीक्षा राठोड यांनी भाषणात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी चौधरी मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रूपाली वानखडे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button