जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक ११ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .तसेच यानिमित्ताने प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आलेले होते ही प्रश्नमंजुषा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित होती . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र . प्रा . डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील , सहा .प्राध्यापक निधी शर्मा , सुवर्णा अहिरे , श्री पंकज वाघ , श्री अरविंद पवार , उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ही राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व द्वीपप्रज्वलन करून झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जयश्री पाटील यांनी केले .प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देशव त्याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली . यानंतर विद्यार्थी शिक्षिका चंद्रलेखा पवार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या थोर कार्यावर निबंधाद्वारे प्रकाश टाकला .त्यानंतर पंकज वाघ यांनी आपण वाचनाची आवड कशी निर्माण करावी व वाचनामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात तसेच ज्या थोर व्यक्तींच्या आपण जयंती साजरा करतो त्यांच्याबद्दलची माहिती ही सुद्धा आपल्याला पुस्तकातूनच मिळत असते .तसेच आपली संस्कृती आपण कशी जोपासावी याबद्दल मार्गदर्शन केले . त्यानंतर महाविद्यालयातील डॉ . प्रतिभा पाटील सुवर्णा अहिरे यांनीही मार्गदर्शन केले . त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम यांनी जिजाऊ मासाहेब यांच्या कर्तुत्वा विषयी तसेच बाल शिवबांवर कशाप्रकारे संस्कार केले यावर चर्चा केली . तसेच स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान हे जगाला आजही कसे उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक तत्त्वज्ञान आजही जगभर कसे उपयुक्त आहे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कशा रीतीने अवलंब केला पाहिजे याबद्दल मत व्यक्त केले तसेच त्यांनी नरेंद्र दत्त हे स्वामी विवेकानंद कसे झाले याबद्दलचा प्रवास सांगितला . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निधी शर्मा यांनी केले .

कार्यक्रम घेण्यासाठी प्रा . डॉ . नारायण खडके यांनी परवानगी दिली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. अनिता जावे,डॉ. जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक यांचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button