

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ तसेच माजी नगरसेवक ॲड. संजय राणे यांची चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी तसेच न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन या कामगार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन हे नियुक्ती करण्यात आलेली आहे. पदाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीतील सर्वच घटकांसाठी उचित काम करणार असल्याचे ॲड. राणे यांनी सांगितले आहे. करून सदरची नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक तसेच सर्वच क्षेत्रातील मित्रपरीवराच्यावतीने मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.




