जळगावप्रशासकीयसामाजिक

जळगाव महानगरपालिका व रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

जळगाव – देशामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय सीमेवरील सैनिकांना व शहरातील गरजूंना वेळेवर रक्त मिळण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 मे 2025 व दिनांक 19 मे 2025 रोजी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मानवतावादी उपक्रमात शहरातील जे रक्तदाते उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन रक्तदान करतील. अशा रक्तदात्यांनी त्यादिवशी त्यांच्या जन्म दाखल्याची मागणी केल्यास, जळगाव शहर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागाकडून त्यांना जन्म दाखल्याच्या 4 प्रती मोफत स्वरूपात पुरविण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी जळगाव महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेले आहे.

तसेच रक्तदात्यांनी दिलेले रक्त हे एका भारतीय सैनिकाचे व शहरातील एखाद्या गरजूचे प्राण वाचवू शकते त्यामुळे या पवित्र कार्यात सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थिती नोंदवून रक्तदान करावे व सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन देखील जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी जळगाव मनपा प्रशासनाच्या वतीने पुनश्च केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button