जळगावसामाजिक

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो: माया धुप्पड

जळगाव – बालकांच्या मनात असणाऱ्या गुजगोष्टी,त्यांचे विश्व साध्या सोप्या भाषेत मांडल्यास,त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेतल्यास लिहिले गेलेल्या साहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो असे मत साहित्यिका माया धुप्पड यांनी सुनिता प्रकाश येवले लिखित,अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या सांग ना आई बालकवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी डाएटचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील,भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल,अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी,प्रा.संध्या महाजन, साहित्यिक अरविंद नारखेडे, पी. झेड.नारखेडे उपस्थित होते.प्रसंगी मान्यवरांचे समयोचित मनोगत झालीत.सूत्र संचालन ज्योती राणे यांनी केले याप्रसंगी आयोजित कविसंमेलनात इंदिरा जाधव, गोविंद पाटील, निंबा बडगुजर, ज्योती वाघ, संध्या भोळे बाविस्कर,सुभाष मराठे,पुष्पलता कोळी, निवृत्तीनाथ कोळी,मकरंद पाटील,मयूर वारडे,सुरेश कुळकर्णी,रेणुका झांबरे, वंदना नेमाडे यांनी कविता सादर केल्यात. तुषार वाघुळदे, अनिल चौधरी, ज्ञानदेव नारखेडे, तृप्ती शिर्के ज्योती खरे, गुंजश्री बोरोले भूषण आमोदकर, संजय येवले सागर येवले श्रुती येवले, दीक्षा येवले मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button