
जळगाव : छावा मराठा युवा महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसैनिक किरण ठाकूर यांचा वाढदिवस शासकीय अपंग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी किरण ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केक भरविला. विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी किरण ठाकूर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रतिमा भेट देऊन तसेच शाल देऊन त्यांचा सत्कार केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे यांच्यासह उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन किरण ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त शासकीय अपंग शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेचा परिसर हिरवागार करण्यासाठी या उपक्रमातून पुढाकार घेण्यात आला.
यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, उपतालुकाप्रमुख सचिन चौधरी, निलेश बोरा, रोहित पाटील तसेच शासकीय अपंग शाळेचे अधीक्षक अक्षय महाजन यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.






