जळगावसामाजिक

स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरेश जैन को-ऑप. हाउसिंग सोसायटीत वृक्षारोपण

जळगाव : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मेहरूण तलाव परिसरातील सुरेश जैन को-ऑप. हाउसिंग सोसायटी येथे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी, झाडे लावा–झाडे जगवा” या ब्रीदवाक्याप्रमाणे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

कर्तव्यदक्ष नागरिक सुनील गेंदालाल कोचूरे यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने व नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करून त्यासाठी आवश्यक कुंपणाचीही व्यवस्था केली. विशेष म्हणजे, केवळ आर्थिक मदत न करता त्यांनी स्वतः वृक्षारोपणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमासाठी दीपक वसंत सोनवणे, हाफिज खान, श्याम जगताप, गोपाल सोनवणे यांच्यासह इतर नागरिकांनीही परिश्रम घेतले. वृक्षांना जल अर्पण करण्याच्या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन किशोर भूतडा, तसेच हेमंत ढंढोरे, धीरज चांगरे, क्रांतिभाई चांगरे, भागवत सनाप, सुनील जाधव, पराग कोचूरे यांच्यासह उपक्रमात सहभागी नागरिक उपस्थित होते.

यावेळी सुनील कोचूरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवावेत, तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करावे, असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button