जळगावसामाजिक

त्रिशरण , पंचशीलाच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो : जयसिंग वाघ 

जळगाव :- भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिशरण, पंचशील ही तत्वे दैनंदिन जीवनात आचरणात आणली तर माणूस एक आदर्श माणूस घडू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. सारनाथ बहुउद्येशिय संस्था , जळगाव तर्फे वाघ नगर येथील बुद्ध विहारात आयोजित ‘ पौर्णिमा वंदनेची ‘ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज माणूस व्यसनाधीन होत आहे , द्वेष , आकस, मत्सर त्याचेत वाढत असल्याने तो भरकटत आहे अश्या प्रसंगी त्याने बुद्ध , धम्म , संघ याची विचारधारा , कार्यप्रणाली समजून घेऊन , हिंसा , चोरी, व्यभिचार करणार नाही , खोटे बोलणार नाही , दारू पिणार नाही अशी शपथ घेतली तर तो नक्की आदर्श जीवन जगू शकेल .

भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणातून सपकाळे यांनी सांगितले की, माणसाने माणसाशी माणसा सारखे वागले तर नवा समाज घडू शकेल जो गौतम बुद्ध यांना अभिप्रेत होता . ईश्वर वाघ यांनी आपल्या मनोगतात देश विदेशातील बौद्ध धर्मीय जनतेची जीवन प्रणाली कशी आहे याची माहिती दिली . जळगाव तेथे शुक्रवारी येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेत जनतेने मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले. मायाबाई अहिरे यांनी विहाराबद्दल माहिती देवून येथे रोज सायंकाळी सहा वाजता बुद्ध वंदना घेतली जाते , पौर्णिमेच्या दिवशी आजपासून विशेष कार्यक्रम घेण्यात येईल असे सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव सोनवणे , प्रास्ताविक पितांबर अहिरे , स्वागत किरणचंद्र आखाडे तर आभारप्रदर्शन विलास सुरवाडे यांनी केले. लक्ष्मीबाई सोनवणे , चारूबाई सुरवाडे , आशाबाई बोदोडे, जनाबाई केदार , विलास सुरवाडे , राहुल अहिरे , बबिता वाघ , बुद्धरत्न वाघ , राजू सोनवणे, करुणा खरे , शांताबाई सपकाळे , सी. आर. सोंदवले, शालुबाई सुरवाडे , करुणाबाई सपकाळे यांच्यासह बहुसंख्य स्त्री – पुरुष हजर होते. सर्व उपस्थितांनी ध्यान धारणा करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button