
जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक २१ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान आंतरवासिता उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्बोधन वर्गाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या वर्गासाठी समन्वयक म्हणून डॉ. जयश्री पाटील उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरवासिता म्हणजे काय, त्याचे जीवनातील महत्त्व तसेच कृती संशोधन आराखडा व अहवाल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शालेय स्तरावरील आंतरवासिता नियोजन व अंमलबजावणी, आंतरवासितेची वैशिष्ट्ये तसेच मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा. सुवर्णा आहिरे यांनी आंतरवासिता अहवाल लेखन, अभ्यासेतर उपक्रम तसेच शिक्षकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटील म्हणाल्या, “आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. आंतरवासिता उद्बोधन वर्गामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढेल.”
या उद्बोधन वर्गास बी.एड. द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






