जळगावशैक्षणिक

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक

जळगाव – सध्याच्या इंधन व गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जा स्रोतांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना जैविक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक इंधन म्हणून बायो ब्रिकेट्स (Bio Briquettes) तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इको क्लबच्या प्रमुख रूपाली आव्हाड मॅडम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बायो ब्रिकेट्स निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविली. सुकी पाने, शेतीतील अवशेष, भुसा यांसारख्या जैविक पदार्थांचा योग्य वापर करून त्यापासून पर्यायी इंधन कसे तयार करता येते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा बचत, जैविक कचऱ्याचा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन आणि पर्यायी ऊर्जास्रोतांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कचऱ्याकडे समस्या म्हणून न पाहता त्याचा उपयोग करून उपयुक्त साधनांची निर्मिती करता येते, हा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

सध्याच्या काळात पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती आणि इंधन बचतीचे महत्त्व लक्षात घेता अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत होत असल्याचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button