

जळगाव – समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने केंद्रीय ग्रामविकास मंत्री कै. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेने यापूर्वी सलग दोन वर्ष सदर क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली असून यावर्षी क्रिकेट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, सचिव प्रवीण सुभाष सानप, सदस्य योगेश किशोर घुगे, कृष्णा दामोदर पाटील, उमेश बाबुराव वाघ, नंदू सुखदेव वंजारी, किरण पंडित वाघ, कैलास महारु सांगळे, समाधान मधुकर चाटे, विनोद पंडित ढाकणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी , माजी नगरसेवक प्रशांत नाईक , माजी स्थायी समितीचे सभापती राजेन्द्र घुगे पाटिल , भुषण लाडवंजारी , नामदेव नाईक , निलेश (सोनी शेठ ) सांगळे , रमेश लाडवंजारी यांच्या उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेत जळगावसह महाराष्ट्र राज्यातील बीड , लातूर , पूणे , छत्रपती संभाजी नगर , अहिल्या नगर , नाशिक , धुळे, मुंबई , ठाणे , कल्याण , वर्धा , नागपुर या जिल्ह्यांमधील वंजारी समाजाच्या एकूण तेरा क्रिकेट संघाच्या मालकांनी सहभाग घेतलेला आहे.
क्रिकेट सामन्यांच्या समितीमध्ये सचिन लाडवंजारी , स्वप्निलसर वंजारी , बाळा पाटील घुगे , रितेश लाडवंजारी , सतिश चाटे , गजानन लाडवंजारी , भानुदास नाईक , दिलीप लाडवंजारी , भगवान लाडवंजारी , योगेश नाईक , राहुल सानप , देवेंद्र नाईक , योगेश लाडवंजारी , वैभव सानप , शेखर लाडवंजारी , संजय पाटील , शरद लाडवंजारी , दुर्गेश नाईक , जगन लाडवंजारी गौरव घुगे , तेजस वाघ , अशोक वंजारी सर , राजेंद्र भागवत पाटील, जगन्नाथ पुंडलिक लाडवंजारी, सुनील बाबुराव लाडवंजारी, संतोष नामदेव चाटे, विकी पुरुषोत्तम सानप, कुणाल दिनेश सानप, रामचंद्र रतिलाल लाडवंजारी, दीपक नाईक, दुर्गेश नाईक, मयूर नाईक, मानव नाईक, संजय लक्ष्मण पाटील, संजय शामराव वाघ, रामा सानप यांच्यासह वंजारी समाज बांधव उपस्थित होते.




