जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव यांचे गांधी तीर्थ येथे क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथील बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षकांसाठी गांधी तीर्थ, जळगाव येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या क्षेत्रभेटीदरम्यान गांधी तीर्थ येथील मार्गदर्शक श्री संदीप सर यांनी विद्यार्थ्यांना गांधी तीर्थाच्या संकल्पनेपासून निर्मिती व उद्घाटनापर्यंतचा सविस्तर इतिहास सांगितला. गांधी तीर्थाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून तेव्हापासून गांधी तीर्थ प्रेक्षकांसाठी खुले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच गांधी तीर्थाच्या एकूण परिसराची रचना व त्यामागील उद्दिष्टे याविषयीही विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यात आले.

यावेळी श्री कुलकर्णी यांनी महात्मा गांधीजींचे विचार, तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थिती, त्या परिस्थितीत त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय तसेच गांधीजींची तत्त्वे दैनंदिन जीवनात कशी अंगीकारता येतील, याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थी-शिक्षकांनी गांधी तीर्थ येथील संग्रहालयास भेट दिली. संग्रहालयातील विविध चित्रे, प्रतिकृती, संदेश व माहितीफलकांच्या माध्यमातून गांधीजींचा जीवनप्रवास, दक्षिण आफ्रिका व भारतातील कार्य, अहिंसेचे तत्त्व, सत्याग्रहाचा आग्रह आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

संग्रहालय भेटीनंतर विद्यार्थी-शिक्षकांनी गांधी तीर्थ येथील सात्त्विक भोजनाचा आस्वाद घेतला.

या यशस्वी क्षेत्रभेटीसाठी संस्थेचे संस्थापक श्री नारायण खडके यांनी प्रेरणा व मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला. यावेळी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सहायक प्राध्यापिका सुवर्ण अहिरे, श्री पंकज वाघ तसेच द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षक अक्षय जाधव आणि प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी-शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शैक्षणिक क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थी-शिक्षकांना गांधीजींच्या विचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला असून ही भेट अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button