

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्त
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणाची प्रार्थना लिहिली म्हणून शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठी सामूहिक पसायदान ठेवण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या वेशात आलेल्या मीत संदीप चौधरी याची शाळेतील शिक्षकांनी मनोभावे पूजा केली .
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, त्यांना ज्ञानेश्वरी आणि पसायदान यांसारख्या महान कार्यांची ओळख करून देणे आणि त्यांना चांगल्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्यास प्रवृत्त करणे. या प्रमुख उद्देशाने सर्व शाळांमध्ये सामुदायिक पसायदान पठण केले असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त रामेश्वर कॉलनी व मेहरून गावामध्ये भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पसायदानाचे पठण उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी केले.




