जळगावसामाजिक

नंदनवन प्रकल्पांतर्गत पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापक मुकेश नाईक यांचा सन्मान!

ग्रीन सिटी फाउंडेशन व हिरवा अंकुर फाउंडेशनच्या संयुक्त आयोजनातून पर्यावरण संवर्धनातील कार्याची दखल

जळगाव : ग्रीन सिटी फाउंडेशन आणि हिरवा अंकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदनवन प्रकल्पांतर्गत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूणचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पर्यावरण महत्त्व २०२६ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानाने शाळेच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा गौरव झाला. यावेळी उपशिक्षिका रूपाली आव्हाड आणि पर्यवेक्षक निलेश पवार यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला मंत्री गुलाबरावजी पाटील, शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजय वाणी, हिरवा अंकुर फाउंडेशनचे निलय शहा, इजाजजी मलिक, करीम सालार, बिट्टू सालार, विनय पारख तसेच वनविभागाचे DFO महेश झंझुरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे बीज बँक, वृक्षसंवर्धन, पर्यावरणपूरक सण-उत्सव, कचरा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमांची या सन्मानाच्या निमित्ताने दखल घेण्यात आली.

हा सन्मान म्हणजे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button