जळगावसामाजिक

संविधानाची पायमल्ली होत गेल्यास देशात अराजकता माजते ….. जयसिंग वाघ 

जळगाव :- संविधान हे देशाला अखंड राखणारे , सर्व देशवासीयांना सुरक्षित ठेवणारे , देशात शांतता , सुरक्षा , एकता आबादित राखणारे महान दस्तावेज असते , संविधानाला राबविणाऱ्या लोकांनी तिची पायमल्ली केल्यास देशात अराजकता माजते हे नेपाळ , बांगला देश , श्रीलंका आदी देशांनी दाखऊन दिले आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

सूर्य जीवनी बहुउद्येशिय संस्था व झालटे प्रतिष्ठान तर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जयसिंग वाघ यांनी अमेरिका , फ्रान्स देशातील संविधान निर्मिती व भारतातील संविधान निर्मिती यातील मूलभूत फरक व त्या त्या देशातील संविधानामुळे त्या त्या देशात घडून आलेले सामाजिक , धार्मिक , राजकीय परिवर्तन विषद केले . अमेरिकेच्या राज्यघटनेत 82 वर्षांनी * समता * हे तत्त्व समाविष्ट करण्यात आले तर * मानवमुक्तीचा जाहीरनामा * फ्रान्स मध्ये 1 वर्षांनी जाहीर झाला मात्र आपल्या संविधानात ही तत्त्वं सुरवाती पासूनच समाविष्ट झालेली आहेत . भारतीय संविधानाने विविध देशातील संविधानातील तत्त्वं स्वीकारली आहेत असा अपप्रचार भारतात करण्यात येतो , अभ्यासक्रमात सुद्धा असे शिकविले जाते मात्र हा भारतीय संविधानाचे अवमूल्यन करणारा खोडसाळ प्रकार आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा उद्योजक संजय इंगळे होते त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व व नागरिक म्हणून आपली जबाबदारी या विषयी विचार व्यक्त केले .

प्रा. हरिश्चंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकपर भाषणात संविधान दिनाचे महत्त्व सांगून संविधान लिहिताना बाबासाहेबांनी किती मेहनत घेतली याची माहिती दिली. सूत्रसंचालन सुकदेव तायडे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद सपकाळे यांनी केले . मुकुंद सपकाळे , दीपक तांबोळी , दिलिप तासखेडकर , रवींद्र इंगळे , अशोक धुरंधर तसेच विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button