जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

जळगाव : सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अनिता वानखेडे यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा तसेच संविधान निर्मितीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे महत्त्व विशद केले.

यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने संविधानाने दिलेल्या मूल्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, श्री. पंकज वाघ तसेच प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button